बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मी स्वत: अजितदादांविरोधात तक्रार करेल”

पुणे | पुण्यातील आंबील ओढ्यातील कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण अजूनच गरम झालं आहे. ही कारवाई पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.

अजित पवार यांच्या आदेशाने ही कारवाई झाली असेल, तर त्यासंबंधी पुरावे द्या. मी तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन, अशी रोखठोक भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली आहे. आज पुणे महापालिकेच्या गेटवर आंदोलन करत असलेल्या आंबील ओढ्याच्या कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बाधित कुटुंबियांसोबत तासभर चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

तसेच, तुमच्यावर झालेल्या कारवाईबद्दल ज्यांना कुणाला जाब विचारायचा असेल, त्यांच्याकडे आपण तुमच्या सोबत येऊ, असं आश्वासनही सुप्रिया सुळेंनी बाधित कुटुंबीयांना दिलं आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक केदार असोसिएट यांची आयुक्तांसोबत बैठक झाली होती. अजित पवार यांच्या आदेशाने आमच्यावर ही कारवाई झाली असल्याची तक्रार बाधित कुटुंबीयांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, बाधित कुटुंबीयांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी थेट महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये यापुढे नागरिकांवर कुठलीही कारवाई होणार नसल्याचं आश्वासनही विक्रमकुमार यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं असल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबीलनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

…नाहीतर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

“संजय राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”

प्रत्येक दलित कुटुंबाला 10 लाख रुपये मिळणार; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तानी तरुणी पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात, देशात येण्यासाठी थेट मोदींकडे विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More