बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तेव्हा मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर आली होती- नितीन गडकरी

जयपूर | केंद्र सरकार मधील कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांना ओळखलं जातं. देशातील विविध ठिकाणी चालू असणाऱ्या कामांबाबत नितीन गडकरी हे दक्ष असतात. आपल्या बेधडक आणि हजरजवाबी बोलण्यासाठी पण गडकरी यांना ओळखलं जातं. आता ही असंच दिलखुलास वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

राजस्थान विधानसभेत आयोजीत कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी राजकीय टोलेबाजी केली. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, मला सुद्धा काॅंग्रेसमध्ये येण्याचं आमंत्रण दिल होतं. पण मी गेलो नाही. त्यांच्या या वक्तव्याचे आता विविध अर्थ काढले जात आहेत.

नागपूरमधील काँग्रेसचे नेते डॉक्टर श्रीकांत माझे चांगले मित्र होते. त्यांनी 17 हून अधिक विषयांमध्ये पीजी केली आहे. त्यावेळी जेव्हा मी निवडणूक हारलो होतो तेव्हा भाजपची स्थिती आज आहे तशी नव्हती. त्यावेळी त्यांनी मला नितीन तू चांगला आहेस, पण तुझ्या पक्षाचं भवितव्य नाही. तू काँग्रेसमध्ये ये असं सांगितलं होतं. त्यावेळी मी नम्रपणे नकार दिला होता, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, राजस्थान विधानसभेला संबोधित करताना गडकरी यांनी राजकारणाच्या पुढे जाऊन आपली मतं मांडली आहेत. राजकीय जीवनात चढ-उतार येत असतात, पण आपण आपल्या विचारधारेशी निष्ठा राखली पाहिजे. आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे असंही गडकरी म्हणाले.

थोडक्यात बातम्या 

लाईव्ह मॅचमध्ये बॅनरला लटकली होती मांजर अन्…; थरारक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

“स्वतःच्या बुडाखाली काय जळतं ते बघा, मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले?”

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More