मुंबई | शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी ठाकरे कुटुंबीयांपासून वेगळे होऊन भाजपसोबत((BJP) सरकार स्थापन केले. त्यावेळी पासून शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. खरी शिवसेना(Shivsena) कोणाची यावरचा वाद कोर्टात पोहोचला आहे.
बंडखोरांच्या मतदारसंघात सत्कारसंमारंभ आणि आणि इतर कार्यक्रमासांठी शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते मालेगाव येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची शिवसेना पुढे न्यायची आहे असं सांगितलं. तसेच आनंद दिघे यांच्यासोबत काय राजकारण झाले, याचा खुलासा लवकरच करणार आहे, असं म्हणत जेव्हा मी मुलाखत घेईन, तेव्हा भूकंप येईल, असं म्हणत शिदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narenda Modi)आणि अमित शहा(Amit Shah) यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिला आहे, असं शिंदे म्हणालेत. तुम्ही लढवय्ये आहात, तुम्ही बाळासाहेबांचे नाव उज्ज्वल कराल असं मोदी आपल्याला म्हणाले आहेत, असं शिंदे म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी(NCP) आणि कॉंग्रेस(Congress) यांच्याशी युती केली. मग बाळासाहेंबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही. मग गद्दारी कोणी केली, असा सवाल शिंदेंनी यावेळी उपस्थित केला आहे. मी कधी कोणाला खालच्या भाषेत बोलत नाही. पण अन्याय झाला तर सहन करणार नाही, मलाही एक दिवस तोंड उघडावे लागेल, असा इशारा नाव न घेता शिंदेनी ठाकरेंना दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा’, रूपाली ठोंबरे आक्रमक
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले…
“हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आलीये”
‘कोश्यारींना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची गरज’, उद्धव ठाकरे भडकले
‘राज्यपाल कोश्यारींनी राजीनामा द्यावा’, संजय राऊत
Comments are closed.