बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यानंतर मी स्वतः ईडी समोर जाणार’; अनिल देशमुखांनी सोडलं मौन

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मागील अनेक महिन्यांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. 100 कोटीच्या वसूली प्रकरणात ईडीने अनेकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं होतं. मात्र, ईडीच्या चौकशीला हजर न राहण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात होती. त्यातच आता अनिल देशमुख यांनी पत्रक काढून आपली भूमिका मांडली आहे.

मी ईडीच्या बाबतीत दाखल केलेली याचिका आता सर्वोच्च न्यायालयानं स्विकारली आहे. सर्वोच्च न्यायालय लवकरच ही याचिका ऐकून घेईल. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयात जाण्याची देखील मुभा दिली आहे, अशी माहिती देशमुखांनी पत्रकाद्वारे दिली. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ही न्यायालयीन प्रकिया संपल्यानंतर मी स्वतः ईडी समोर जाणार असल्याचं देखील अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

ईडीच्या कामात मी त्यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं देखील अनिल देशमुखांनी सांगितलं आहे. माझ्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शाचं पालन केलं आहे, असंही देशमुखांनी या पत्रात म्हटलंय. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर अनिल देशमुख काही दिवसांपुर्वी नाॅट रिचेबल होते. त्यानंतर आता त्यांनी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावलं आहे. बुधवारी ईडीने नोटीस पाठवून ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. पण आजही ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी ईडी कार्यालयात पत्र पाठवलं आहे.

पाहा पत्र-

थोडक्यात बातम्या-

काय सांगता? …म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील अधिकाऱ्याला दिलं चॅाकलेट!

बाबो! लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या ‘या’ बड्या खेळाडूने सोडला संघ

नारायण राणे संतापले; म्हणाले, “मांजरीसारखं मला आडवं येऊ नका!”

भाजप शहराध्यक्षाकडे उधारी मागणारी कमेंट अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

नेक्सॉनच्या यशानंतर येतेय टाटांची ‘ही’ इलेक्ट्रीक गाडी, फक्त 21 हजार रुपये…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More