बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा आक्रमक

मुंबई | राज्याचं आर्थिक अधिवेशन सुरु असून राजकीय वर्तुळात अनेक हालचाली पहायला मिळत आहे. आज विधानसभेत आमदार रवि राणा आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले. अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा (ravi rana) यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे पडसाद आज विधानसभेत दिसले.

आमदार रवि राणा यांनी शाईफेक प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर आरोप केल्याचं पहायला मिळालं. शाईफेक प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं.

मी खोटं बोलत असेल तर माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात सर्व पुरावे आहेत. मी घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईल, मला फाशी द्या, असा आक्रमक पवित्रा रवी राणांनी घेतलेला पहायला मिळाला.

दरम्यान, एवडं प्रेशर आहे, एवढं प्रेशर आहे की रवी राणा दिसला की गोळ्या मारा असं सांगितलं गेल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे, असं रवी राणा म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

“ED आणि BD ची तुम्ही चिंता करु नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची CD निघाली तर…”

‘दाऊद के दलालों को, जुते मारो सालों को’, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

“…तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या गंगाकिनारी डमरू वाजवत होते”

तब्बल 6 वर्षांनी आर्ची आणि परश्यानं ‘तो’ सीन केला रिक्रिएट, पाहा भन्नाट व्हिडीओ

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More