Top News अहमदनगर महाराष्ट्र

‘…तर हे माझं शेवटचं आंदोलन असेल’; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

अहमदनगर | सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलत असताना केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.

शेतकऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे, पण सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. हे सरकार केवळ पोकळ आश्वासनं देत आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही, असं अण्णा हजारे म्हणालेत.

मी त्यांना जानेवारी महिन्याची मुदत दिली आहे. जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी आमरण उपोषणाला बसेन. हे माझं शेवटचं आंदोलन असेल, असं अण्णांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून राहुल गांधी इटलीला गेले’; ‘या’ काँग्रेस खासदारानं सांगितलं कारण

रनआऊट दिल्याच्या निर्णयावर कर्णधार अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला…

बीडच्या तरुणाकडून तरुणीवर कारमध्ये अत्याचार; गजबजलेल्या भागातील घटनेनं औरंबादमध्ये खळबळ

नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल- संजय राऊत

भाजपला रोखणाऱ्या नेत्यांना त्रास देण्यासाठी कागदाचे तुकडे पाठवले जात आहेत- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या