मुंबई | सध्या बिग बॉस सीझन14 ची महाअंतिमफेरीम पार पडली. बिग बॉस 14 मध्ये अभिनेत्री रुबिना दिलेकने बाजी मारली तर दुसऱ्या स्थानावर राहुल वैद्य राहिला. सोशल माध्यमांवर बिग बॉस विजेत्यांची चर्चा आहेच तर सोबत या कार्यक्रमाला सुत्रसंचालन करणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता भाईजान सलमान खान बाबतही चर्चा रंगली आहे. नेमकी काय चर्चा आहे तर सलमान आपल्या लग्नाबाबत एक वक्तव्य केलं आहे.
बिग बॉसच्या अंतिम भागाची रंगत भाईजानने आपल्या शैलीत वाढवली. या अंतिमफेरीला डान्स दिवाने या नवीन कार्यक्रमातील लहानग्याने हजेरी लावली होती. यावेळी सलमान खानने त्या लहान मुलाला त्याचं नाव विचारलं तर त्या लहान मुलाला सलमान खानला, मला सलमान खान नाही तर सोहेल खान आवडतो. मुलाले दिलेल्या या उत्तराला सलमाननेही अलग अंदाजात मिश्किल टिपण्णी केली.
जर मी वेळेवर लग्न केलं असतं तर तुझ्याइतके मला नातवंडं असती, असं सलमान खान म्हणाला. सलमान खान असं बोलल्यावर सर्व प्रेक्षक खळखळून हसले. सलमान खान म्हटलं की त्याच्या लग्नाचा विषय हा निगतोच मात्र सलमान स्वत: यावर बोलल्याने सर्वांनाच हसू आलं.
दरम्यान, बिग बॉसच्या अंतिम तिघांमध्ये रुबिना, राहुल आणि निक्की तांबोळी यांच्यात टक्कर पाहायला मिळाली होती. मात्र यामध्ये रुबिनाने बाजी मारत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
थोडक्यात बातम्या-
गिरीश महाजन सध्या लहान आहेत त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही- नाना पटोले
‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका
ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!
शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन
आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा