नवी दिल्ली | डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा सहा विकेट्सने पराभव केला. या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार कोहलीला फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करता आली नाही.
याचवरून भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने कोहलीवर टीका केलीये. कर्णधारपदासाठी बंगळुरूने विराट कोहलीच्या पुढे विचार करण्याची वेळ आली असल्याचं गंभीरने म्हटलंय.
.@GautamGambhir says it is time for Bangalore to look beyond Virat Kohli as captain 🏏https://t.co/hbe8aQOUsg #T20Timeout pic.twitter.com/9ntEpG1uDY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 7, 2020
गौतम गंभीर म्हणाला, “जर मी बंगळुरू संघाच्या व्यवस्थापनात असतो तर कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकलं असतं. रविचंद्रन अश्विनने दोन वर्ष किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी कर्णधारपद भूषवलं. मात्र चांगली कामगिरी करता न आल्याने त्याला काढून टाकण्यात आलं.”
“आयपीएलची महेंद्रसिंग धोनीने 3 विजेतेपद जिंकली आहेत तर रोहित शर्माकडे चार आहेत, म्हणूनच त्यांनी कर्णधारपदाची धुरा सांभाळली. मला खात्री आहे की, रोहितने 8 वर्षांपासून जर सिद्ध केलं नसतं तर त्यालाही काढून टाकण्यात आलं असतं. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी गोष्ट असू नये,” असंही गंभीर पुढे म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
…हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे; शिवसेनेची भाजपवर टीका
“मंत्रीपदासाठी भाजपमध्ये गेलेल्या मंडळींना शपथेची स्वप्न पडतायत”
हिवाळी अधिवेशन नागपूरातच घ्या, भाजप आमदारांची मागणी
अखेर शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर ऑनलाईन शाळांना ‘इतक्या’ दिवसांची सुट्टी जाहीर!
“राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार”