Top News महाराष्ट्र मुंबई

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाचा फैलाव सध्यातरी मंदावला असला तरी, मुंबईतील कोरोना अद्यापही संपुष्टात आलेला नाही. असं असतानाही नाईट क्लबमध्ये मास्क न घालता अक्षरश: धिंगाणा सुरु असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांत नाईट क्लबची ही परिस्थिती सुधारली नाही तर रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू लावला जाईल, असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले असतानाही अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.परळ आणि वांद्रे येथील नाईट क्लबमध्ये हा प्रकार समोर आला आहे. पालिकेने या ठिकाणी धाड मारल्यानंतर हजारो जणांच्या तोंडाला मास्क न असल्याचे आढळून आले असल्याचे पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले

याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.  त्यामुळे आगामी काळात मुंबईतील सर्व नाईट क्लबवर नजर ठेवून नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश सर्व 24 विभागांतील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्याचेही पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

दरम्यान, नियंत्रणात असलेली कोरोनाची स्थिती कायम राहिल्यास नव्या वर्षात लोकल सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

’31 डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…’; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार का?, शरद पवार म्हणतात…

गायिका कार्तिकी गायकवाडचं शुभमंगल सावधान; पाहा लग्नातील निवडक फोटो

नवनीत राणांचं रावसाहेब दानवेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती…- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या