बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बेईमानी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला, पोलीस केसचं काय ते मी बघून घेईल”

नागपूर | सध्या राजकीय वर्तुळात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू असतानाच आता काँग्रेस नेते सुनील केदार यांनी स्वपक्षातील बेईमानी करणाऱ्या नेत्याला लाथांनी मारण्याचं वक्तव्य केलं आहे.

नुकतंच नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणुक आणि जिल्हा परिषद समित्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यानंतर नागपूरमध्ये राजकीय दौऱ्यांना वेग आला आहे. सुनील केदार यांनी देखील काल नागपूरमध्ये आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सुनिल केदार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसचा कितीही मोठा नेता पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला तिथेच गाडीतून खाली उतरवा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसचं काय ते मी पाहून घेईल. परंतु गद्दारांना धडा शिकवा, असं सुनिल केदार यांनी केलं म्हटलं आहे.

दरम्यान, तसेच आपण सर्वांनी मेहनतीने हा पक्ष उभा केला आहे. कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्या मागे आहे मग मी पक्षात मला वाटेल ते करणार हे अजिबात चालणार नाही. पक्षाशी बेईमानी करणाऱ्या प्रत्येकाला त्याची शिक्षा भोगावी लागेल, असं देखील सुनील केदार यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘भविष्यातही कोरोना महामारीपासून सुटका नाहीच’; गगनदीप कांग यांचं मोठं वक्तव्य

मराठवाड्यातील नद्यांना महापुराचा धोका; मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली पिकं संकटात

किचनमध्ये काम करताना अचानक महिलेच्या केसांनी घेतला पेट अन्…; पाहा व्हिडीओ

पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याचा पाणीप्रश्न सुटला, मुळशी धरणातून ‘इतके’ TMC पाणी मिळणार

सांगा पाहू दबंग कोण?; अमोल मिटकरींनी मांडलं आघाडीचं गणित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More