बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर किसान सभा राज्य सरकारचा कठोर प्रतिकार करेल”

नवी दिल्ली | केंद्र सरकारने नव्याने संमत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. तरी देखील अद्याप केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

महाराष्ट्र सरकारने या नव्या कृषी कायद्यांमध्ये थोडेफार बदल करुन महाराष्ट्रात हे कायदे लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यावरुनच आता अखिल भारतीय किसान सभेचेे डॉ. अजित नवले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारचं हे कार्य निषेधार्थ असल्यानं किसान सभा याचा कठोर प्रतिकार करेल, असं म्हटलं आहे.

नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या संघर्ष अद्याप चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीने देखील या कायद्यांना विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसताना महाराष्ट्र सरकार या कृषी कायद्यांमधील तरतुदी लागू करण्याची घाई का करत आहे?, असा सवाल डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

तसेच एकिकडे राज्य सरकार कृषी कायद्यांना विरोध करत आहे तर दुसरीकडे मागच्या दराने कायद्यांंमधील बहुतांश तरतुदी राज्यात नव्याने लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. किसान सभा याचा कठोर प्रतिकार करेल. वेळ पडल्यास राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही नवले यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! सोलापुरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

“अमित शहा चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे माहित नाही”

धक्कादायक! बुलडाण्यातील रूग्णालयात एकाच कोरोना रुग्णाला दिले तब्बल 14 रेमडेसिविरचे डोस

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेसोबत अफेअरच्या चर्चांवर अलायानं केला खुलासा, म्हणाली….

“होय, मी धमकी देतोय! भाजप नेते मंचावर आले तर एक एकाचे बक्कल्स काढले जातील”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More