बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहरातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal) यांनी लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या 20 हजारांच्यावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाचं लागेल, असं इकबाल चहल यांनी सांगितलं आहे. मुंबईत 3 जानेवारीला 8 हजार 82 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर चहल यांनी लॉकडाऊनबाबत इशारा दिला आहे.

“मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. महापालिकेकडे 30 हजार पेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या आहेत. औषधे आहेत, व्हेटीलेटर आहे, अशी माहिती चहल यांनी दिली आहे. मात्र, आता ओमिक्रॉन वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून दूर कसं राहता येईलं हे पहावं,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, मुंबईत मागील 24 तासात 8 हजार 82 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर 622 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत एकूण 37 हजार 274 कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तर  आत्तापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या 7 लाख 51 हजार 358 इतकी आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते.

थोडक्यात बातम्या-

खुल्लम खुल्ला प्यार!, औरंगाबादच्या रस्त्यावरील तरुण-तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

‘नितेश राणेंना त्यांच्याच घरात लपवलंय’; शिवसेना आमदाराचा धक्कादायक आरोप

‘या’ गोष्टीचा सनी लिओनीला आजही होतो त्रास, स्वत: केला खुलासा

समीर वानखेडेंच्या बदलीवर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

झाड फेकी प्रकरणावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More