बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तरच राज्यात Lockdownचा निर्णय होईल’; राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णसंख्या आता खाली येत असतानाच नव्या Omicron variant ने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आता Omicronचा वाढता संसर्ग पाहता आता महाराष्ट्रातही लाॅकडाऊन (Lockdown) करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात Omicronची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आता राज्य सरकार अलर्ट झालं आहे. मात्र, लगेचच लाॅकडाऊन लावणं हे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं, असं सुचक वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. यासंदर्भात परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.

सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. टास्क फोर्सशी चर्चा करून नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर केंद्र सरकारसोबत देखील चर्चा करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राजकीय बैठका तसेच मेळाव्यांच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी नियमांचं पालन करावं, असंही टोपे यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढील दोन तीन दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन Omicron चे संकट परतवण्यासाठी आणखी कडक निर्बंध घालायचे की नाही यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यामुळे आता राज्यातील जनता चिंतेत असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ घटनेला जबाबदार कोण?; अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण

“बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या”

मथुरेत तणावाचं वातावरण, शहरात कलम 144 लागू

शिवसेना काँग्रेसचा हात धरणार का?; संजय राऊतांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

ठाकरे सरकारला मोठा झटका! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More