Top News महाराष्ट्र मुंबई

…तर उत्तर प्रदेशात मायानगरी आपोआप निर्माण होईल; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील बॉलिवूड निर्मात्यांशी चर्चा करुन आर्थिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ते उत्तर प्रदेशात मुंबईसारखी फिल्मसिटी बनवण्यावर अधिक भर देत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतली मायानगरी यूपीला हलवण्याचा योगी आदित्यनाथांचा प्रयत्न असल्याचा दावा करत, शिवसेनेने योगींवर निशाणा साधला आहे.

‘उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल’, असा खोचक सल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून योगींना देण्यात आला आहे.

योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नसल्याचे शिवसेनेनी सामनामध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”

“भाजपच्या नटीने मुंबईला ‘पीओके’ म्हटले त्याच भाजपच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या विकासासाठी मुंबईत यावं लागलं”

सुपर न्यूमररी पद्धतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक- खासदार संभाजीराजे

“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही, पवार इज पॉवर”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या