बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मला आणि भाजपला मैदानात उतरावं लागेल’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय चर्चिला जात आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नाही, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. ओबीसी राजकीय आरक्षणामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच आता ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ओबीसी समाजात वेगवेगळी आडनाव असतात. त्याचा अभ्यास करून संबंधित व्यक्ती कुठल्या समाजाची आहे. हे ठरवावं लागतं. परंतु, महाविकास आघाडी सरकारचे या सर्वेक्षणाकडे अजिबात लक्ष नाही. अशा प्रकारचे सर्वेक्षण सुरू राहिले तर सर्वेक्षणाअंती ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचं दिसून येईल आणि याचा मोठा परिणाम पुढील आरक्षणावर होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

माझ्याकडे आलेली आकडेवारी मी योग्य वेळी सादर करेल. मी आजच अतिशय स्पष्टपणे सांगत आहे. राज्य सरकारला नेहमी उशीरा जाग येते. या डेटामध्ये अनेक जिल्ह्यांचे ओबीसींच्या लोकसंख्येचे आकडे चुकत आहेत. यामुळे ओबीसींवर दुसऱ्याही आरक्षणात अन्याय होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राज्य सरकारने आमच्या इशाऱ्याकडे लक्ष नाही दिलं तर ओबीसींचं मोठं नुकसान होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकार सर्वेक्षणामध्ये जी आकडेवारी नोंद करत आहे ती आकडेवारी खुप कमी आहे. इम्पेरिकल डेटा तयार करण्याच्या पद्धतीवर सरकारने लक्ष घातलं नाही तर मला आणि भाजपला माझ्याकडे असलेल्या आकडेवारीसह मैदानात उतरावं लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

“राज्यसभा निवडणुकीत संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”

“राखी सावंतने माझा फायदा घेतला, तिने माझं शोषण केलं”

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल”

ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More