Top News

…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे

जळगाव | भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेशांनंतर ते आज जळगावमध्ये परतले. यावेळ खडसे यांनी एक मोठी मनातील गोष्ट बोलून दाखवली.

मी आणखी काही काळ जर भाजपमध्ये राहिलो असतो तर माझी अवस्था देखील वाजपेयी आणि अडवाणींसारखी झाली असती, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

खडसे म्हणाले, भाजप पक्षाविषयी माझ्या मनात भरपूर आदर आहे. मात्र भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय करत मला फार त्रास दिला.

भाजपात अजून मी राहिलो असतो तर अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झालं कदाचित तेच माझ्या बाबतीत घडलं असते. म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतलाय. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने मी त्यांचे आभार मानतो, असंही खडसे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“…तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही”

कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके मुख्यमंत्री कोत्या मनाचे नाही- संजय राऊत

आरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…

चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत

“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या