बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

मुंबई | स्थानिक संस्थांच्या निवडणुकीकरिता (Local Body Election) ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राजकिय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारला (State Government) मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती दुर्दैवी आहे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Supreme Court stays OBC reservation ordinance)

मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणाले होते  की, शासनाने सुधारित आदेश दिल्यास एक महिन्यात आपण अहवाल देऊ शकतो. मात्र, त्यावर कार्यवाही न करता अध्यादेश काढल्याने आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे. ‘माझी आजही कळकळीची विनंती आहे की, यामध्ये तात्काळ सुधारणा केली तर आरक्षण परत मिळू शकते. ओबीसींना त्यांचा हक्क आपण पुन्हा प्रदान करू शकतो. कृपया माझे 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरचे ट्विट पहावे, तीच बाब सर्वोच्च न्यायालयाने आज अधोरेखित केली आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तसेच माननीय सर्वेोच्च न्यायालयाने आज पुन्हा सांगितले आहे की, राज्य मागासवर्ग आयोगाने (State Backward Class Commission) स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय अभ्यास करून अहवाल तयार न करता अध्यादेश काढणे अयोग्य आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सर्वपक्षीय बैठकीत नेमका हाच मुद्दा मी मांडला होता. पण, ते न करता शासनाने अध्यादेश काढला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या- 

चिंता वाढली! पुणे आणि डोंबिवली पाठोपाठ ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करतो, पण ते माझा फोन घेत नाहीत”

OBC Reservationचा वाद पेटला! भुजबळ म्हणतात,”फडणवीस त्यांना थांबवत का नाहीत?”

“नाना पटोलेजी राजकारण ठेवा बाजूला, तुम्ही स्वत:ला OBC नेता समजता ना?”

“उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही, खरा वाघ पहायला अधिवेशनात येणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More