Top News महाराष्ट्र मुंबई

…तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Photo Credit- Twitter / @CMOMaharashtra

मुंबई | सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पसरली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन पडणार की काय? याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

कोरोनाची लाट जेव्हा खाली येते तेव्हाच तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशांमध्येही आपल्यासारखीच शिथलता आणली. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ आली त्यामुळे आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल ही सूचना कोरोना आपल्याला देत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये रुग्ण डबल झालेत कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडक मारत आहे. पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत. अचानक लॉकडाऊन करणं घातक आहे. उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घाला आणि जनतेला 24 तासांचा वेळ द्या, असे आदेशही उद्धव ठाकरेंनी स्थनिक प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर

काँग्रेसच्या जनआक्रोश राॅलीत डान्सरचे ठुमके, पाहा व्हिडीओ

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी- गणेश नाईक

आधी माझा देश, जगाने धीर धरावा – अदार पुनावाला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या