देश

… तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर बनवू!

लखनऊ | सध्या राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. जर तिथून काही झालं नाही तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर उभारू, असं उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितलं.

जेव्हा दोन्ही पर्याय संपतील तेव्हा संसदेच्या माध्यमातून मंदिर निर्माणाच्या दिशेने प्रयत्न होतील. मात्र सध्या हा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. परस्पर सामंजस्याने दोन्ही पर्यायांवर सहमती न झाल्यास हा तिसरा पर्याय शिल्लक राहतो, असं ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही सर्वोच्च न्यायालयाला आवाहन करतो की हा प्रश्न न्यायालयाने लवकरात लवकर सोडवावा. प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे की राम मंदिर व्हावं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून भावी बायकोनं नवऱ्या मुलाला विषारी चाॅकलेट देऊन संपवलं!

-अटलजी सोडून गेल्याचा प्रचंड त्रास होतोय; शोकसभेत लालकृष्ण अडवाणी भावूक

-छोट्या वाहनांना मोठा दिलासा; एक महिन्यासाठी टोलमाफी

-MIM च्या नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक!

-सनी लियोनीनं केली केरळसाठी 5 कोटींची मदत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या