महाराष्ट्र मुंबई

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल- संजय राऊत

मुंबई | जर लोकांच्या नोकऱ्या जाण्याची समस्येवर तोडगा निघाला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो, असं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार आणि उद्योगांचे तब्बल 4 लाख कोटींचं नुकसान झालं. लोकांची सहन करण्याची एक मर्यादा असते, ते फक्त अपेक्षा आणि आश्वासनावर जिवंत राहू शकत नाहीत. जरी प्रभू रामाचा वनवास संपलेला असेल तरी सध्या कठीण काळ आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. कोणालाही आपल्या आयुष्यात यापूर्वी इतकं असुरक्षित वाटलं नसेल असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

इस्त्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिक नेतन्याहू यांच्याविरोधात प्रदर्शने सुरु आहेत. कोरोना महामारी आणि जागतिक आर्थिक संकटाशी लढण्यास असमर्थ राहिल्याने लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतातही हे पाहायला मिळू शकतं असं सांगत राफेलच्या आधी भारतात सुखोई, एमआयजी विमान आणली गेली, पण राफेलसारखा जल्लोष कधी केला नाही, या राफेल विमानामध्ये बेरोजगारी आणि आर्थिक आव्हानाचं संकट संपवण्याची क्षमता आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राजस्थानात गहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सांगतात महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता आणणार पण कोणीही कोरोना संकट, बेरोजगारी यावर चर्चा करत नाही. कोरोना संकटाशी कशाप्रकारे लढायचं आहे हे कोणालाच माहिती नाही असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

महिला क्रिकेटपटूंसाठी IPL ची घोषणा लवकरच करणार- सौरव गांगुली

धक्कादायक! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

‘….तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो’; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

‘राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलंय’; ‘या’ भाजप खासदाराचा घरचा आहे

श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही- जितेंद्र आव्हाड

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या