…तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही राजीनामा घ्यावा- नाना पटोले
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबॉम्बवरून सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आणि गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी मुंबईमधून 100 कोटी जमा करायला सांगितले असल्याचं परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं होतं. यावरून विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला आहे.
आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा, असं नाना पटोले म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अंबानी आणि अदानीसाठी केंद्र सरकार काम करतंय हे सामान्य जनता बोलत आहे. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यायला हवा आणि त्यांचीही चौकशी करायला हवी. लोकशाहीमध्ये जनता सर्वात मोठी असते असं आम्ही मानतो. ते लोक मानतात की नाही माहित नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावेळी नानांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर आरोप झाल्याची आठवण करून दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्याही मंत्र्यांवर आरोप झाले होते. त्यावेळी फडणवीसांनी राजीनामे घेतले का?, फडणवीसच सर्वांना क्लिन चिट देत फिरत होते आणि तेच न्यायाधीश बनत होते, असं म्हणत पटोलेंनी फडणवीसांवरही निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
‘रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठींबा देण्यासाठी सांगितलं का?’; यड्रावकरांनी सांगितली अंदर की बात
…अन् पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार- देवेंद्र फडणवीस
पूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.