बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

पुणे | राज्यात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरूद्ध शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेकडून राज्यातील विविध शहरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज सकाळी नाशिक पोलीस नारायण राणेंना अटक करण्यासाठी चिपळूनच्या दिशेने रवाना झाले आहेत.

नारायण राणेंवर दाखल झालेले गुन्हे हे दखलपात्र आणि अजामिनपात्र स्वरूपाचे आहेत. राणेंनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य हे असभ्य, हिंसक व बेतालपणाचं आहे. त्यांना मंत्री असल्यामुळे अटक होऊ शकते का?, संसदेत केलेल्या वक्तव्यांना असलेले विशेषाधिकारांचे संरक्षण आहे. पण केंद्रीय मंत्री राणे यांनी केलेलं वक्तव्य जाहीर भाषणात केलं आहे. कोणत्याही मंत्र्यांने त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून एखादं वक्तव्य केलं असेल तर ते वक्तव्य त्यांच्या कामाच्या जबाबदारीचा भाग सद्भावनेनं ते वक्तव्य केलं आहे असा बचाव करता येऊ शकतो, असं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं आहे.

नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या कार्यालयीन कामकाजाचा भाग नाही, त्यामुळे त्यांना विशेषाधिकारांपासून कायदेशीर संरक्षण मिळू शकत नाही. कलम 41 सीआरपीसीनुसार राणेंना का अटक होऊ नये यासाठी पोलीस त्यांना नोटीस देऊ शकतात. त्यानंतर त्यांना अटक करता येऊ शकते, असं असीम सरोदे म्हणतात.

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंची माफी मागावी आणि शिवसेनेनं पण जास्त गंभीरपणे हे प्रकरणा घेऊ नये. सरकारने पण गुन्हे रद्द करावेत आणि प्रकरण हे संपवून टाकावं, असं सरोदे यांनी म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या –

“नारायण राणेंना अटक करण्याची तुमच्यात हिंमत नाही”

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

‘…तरच विसर्जनात सहभागी होता येणार’; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर

“तो फक्त मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचाही अपमान”

नारायण राणेंचे बाण ठाकरेंच्या वर्मी लागलेले दिसत आहेत- अतुल भातखळकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More