‘…तर आदरणीय पवारजींना जाब विचारायला हवा’; काँग्रेस नेत्याचा शरद पवारांवर निशाणा
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर पत्राद्वारे केलेल्या गंभीर आणि धक्कादायक आरोपामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी वसुल करायला लावले असल्याचा आरोप मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केला आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र अशातच काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी या प्रकरणावरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाच्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांचाही उल्लेख आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली होती. मात्र त्यांना याबाबत आधीपासूनच या सगळ्याची कल्पना असल्याचं परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्यास आणि त्याचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत, असं संजय निरूमप यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात निरूपम यांनी ट्विट केलं आहे. यासोबतच त्यांनी तथाकथित आघाडीवरून सवाल केल आहे.
दरम्यान, तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, असंही संजय निरूमप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
If at all, whatever Parambir Singh is saying is truth, question should be asked from Hon Sharad Pawar ji because he is the arcitect of current Maharashtra Govt. Is it what the so called third front is going to do finally ?
Congress must take a stand on this issue.#AnilDeshmukh— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 20, 2021
थोडक्यात बातम्या-
सरकारमधील प्रत्येकानं आपले पाय जमिनीवर आहेत का पाहावं- संजय राऊत
‘…म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा होता’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा- तृप्ती देसाई
बाबो! ख्रिस जॉर्डनने एका हातात घेतलेल्या अफलातून झेलवर सगळेच फिदा, पाहा व्हिडीओ
Comments are closed.