बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वाद विकोपाला गेला तर आम्हाला दंगल काही नवीन नाही’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात सर्वत्र निर्बंध लावण्यात आले होते. आता कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी राज्यातील काही भागात अद्याप परवानगी देण्यात आली नाही. प्रशासनाच्या या निर्णयाचा व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यातच आता व्यापाऱ्यांच्या मागणीवरून भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मिरजमध्ये गेले कित्येक दिवस व्यापारी दुकानं उघडण्याची परवानगी मागत आहे. परंतु प्रशासनाने व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्यास परवानगी दिली नाही. मिरजमध्ये कोरोनाच्या पाश्वभूमीवर कडक निर्बंध लागू असल्यानं ही परवानगी दिली नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. दोन वेळा व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्य भितीने पुन्हा दुकानं बंद करावी लागली होती. व्यापाऱ्यांच्या या मागणीवरून भाजप आमदार सुरेश खाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आमदार सुरेश खाडे यांनी बुधवारी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यात व्यापाऱ्यांनी आपली भूमिका आमदारांसमोर मांडली. त्यानंतर येत्या शुक्रवारपासून दुकानं पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आमदार खाडे यांनी व्यापाऱ्यांना संबोधित केलं. त्यावेळी ‘आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याच्या आड आले, तर वाद विकोपाला जाईल. त्यामुळे मिरजेत दंगल काही नवीन नाही’, असं वादग्रस्त वक्तव्य सुरेश खाडे यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोना काळानंतर देखील व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक अडचण झाली आहे. तर काहींचे व्यवसाय कायमचे बंद पडले आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून व्यापारी रस्त्यावर येत आंदोलन करताना दिसत आहेत. लसीकरण प्रकिया पुर्ण केलेल्या व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

काश्मीर पुनश्च भारताचं नंदनवन म्हणून ओळखलं जाईल- भगतसिंह कोश्यारी

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ योजनेची चौकशी होण्याची शक्यता

बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रदोह झाला असता- यशोमती ठाकूर

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये अवघे ‘इतके’ रुग्ण सक्रिय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More