बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर शिवसेेनेचे आमदार भाजपसोबत गेले असते’; शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

सोलापूर | राज्यात फडणवीस सरकार सत्तेत असताना शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. तो वाद काही काळानंतर वाढत गेला आणि मुंबई महाापलिकेच्या निवडणुकीत सेना आणि भाजप एकमेकांविरूद्ध लढले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला डच्चू देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. अशातच आता शिवसेनेचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी संयमाने वागले असते तर आज शिवसेनेचे आमदार भाजपसोबत असले असते, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील आज पंढरपूरात होते. त्यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. परंतु ही मदत कमी असल्याची जाणीव आम्हाला आहे, अशी खंत देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान,  कोरोनामुळे अनेक संकटं आली, आता कोरोनाचं संकट कमी झालं आहे आणि हे संकट आता असंच कमी होऊ दे, असं साकडं आपण विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं गुलाबराव पाटलांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आमदारांची दिवाळी गोड! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिवाळीनिमित्त BSNLची खास ऑफर! ‘या’ महिन्यात मिळेल फुकट डेटा-काॅलिंग

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More