बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

मुंबई | महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्थानिक निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच मुद्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणं यात चुकीचं काय आहे? भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करत आहेत हे चांगलंच झालं. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचं सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलंच आहे, असं सुचक वक्तव्य सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. कोरोनाच्या परिस्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागलं आहे. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ग्रस्त असतील असे कधीच वाटले नव्हतं, अशी टीका शिवसेनेनं काँग्रेसवर केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे, असा टोला शिवसेनेनं पटोलेंना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपला मोठा धक्का?; 25-30 आमदार अन् 2 खासदार भाजप सोडण्याच्या तयारीत?

‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक

कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; भारत बायोटेक अन् केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More