बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

नवी दिल्ली | काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश कुमार (Ramesh Kumar) यांनी कर्नाटक विधानसभेत बलात्काराविषयी (Rape) एक खळबळजनक वक्तव्य केलं. या वादग्रस्त वक्तव्याचे सध्या चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहे. अशातच त्यांना टीकांचाही सामना करावा लागत आहे.

‘जर बलात्कार रोखणे कठीण असेल तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या’, असं वादग्रस्त वक्तव्य वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश कुमार यांनी विधानसभेत केलं. त्यांच्या वक्तव्यानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यामुळे रमेश कुमार चांगेलच चर्चेत आले आहेत.

पुढे रमेश कुमार म्हणाले की, मी सिस्टम नियंत्रित करू शकत नाही. माझी चिंता सभागृहाच्या कामकाजाबाबत आहे. हे पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. प्रत्येकाला वेळ देत राहिलो तर हे सत्र कसे चालेल?

दरम्यान, रमेश कुमार यांच्या विधानावर आक्षेप घेण्याऐवजी सभापती आणि सदस्य हसायला लागले. याशिवाय रमेश कुमार यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळेही त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

चिंताजनक: महाराष्ट्र राज्य ठरतंय Omicronचं हाॅटस्पाॅट

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही”

येत्या 3-4 दिवसांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

बाळा नांदगावकर मनसे सोडणार???, नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

जेवणाच्या पंगतीत राज ठाकरे खुर्चीवर अन् कार्यकर्ते जमिनीवर; मनसेनं सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More