बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाच्या विषाणूचे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत असल्यामुळं तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशातच आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविषयी जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा गंभीर इशार दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलं की, जेव्हा कोरोना संपवावं असं जगाला वाटेल तेव्हा कोरोना महामारी नष्ट होऊन जाईल. मात्र कोरोनाला संपवणं आपल्या हातात असून त्यासाठी आपल्याकडे आवश्यक उपकरणंही आहेत.

सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो. कोरोना रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त कार्यक्षम आणि जास्त प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, अजूनही अनेक राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच कोरोनाची भीती अजूनही अनेकांच्या मनात असलेली पाहायला मिळत आहे. 

थोडक्यात बातम्या –

कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत

‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित

एसटी कर्मचाऱ्यांची दादागिरी; वृद्धाला जबर मारहाण, पाहा व्हिडीओ

एकतर्फी प्रेमातून विवाहितेनं उचललं हे टोकाचं पाऊल!

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More