बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…मग हालचाली तर निश्चितच वाढणार’; पवार-मोदी भेटीवर मुनगंटीवारांचं ट्वीट

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मोदी आणि पवारांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली आहे. या भेटीमागे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता या भेटीवरून भाजप आमदार सुधील मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी शरद पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली होती. तोच व्हिडिओ मुनगंटीवार यांनी पुन्हा ट्वीट केलं आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये पवारांना खोचक टोला लगावला होता. अमित शाह यांच्याकडे सहकार खातं गेल्यानंतर हालचाली तर निश्चितच वाढणार आहेत, असं कॅप्शन मुनगंटीवारांनी गुरुवारचा व्हिडीओ पुन्हा शेअर करत दिला आहे.

तसेच आत्तापर्यंत एकाधिकार होता. सत्तेचा उपयोग करुन मनात जे येईल ते केलं जायचं. मात्र, आता जनतेच्या अधिकाराच्या अंकुशामुळे तुम्हाला स्वैराचार करण्यास बंदी असणार आहे, असं मुनगंटीवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

दरम्यान, पवारांनी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्री पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली. आज थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

अबब! ईडीने अनिल देशमुख यांची तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त

लोकशाहीची निंदा करणाऱ्या भाजपच्या गुंडांना शिक्षा व्हायलाच हवी – प्रियंका गांधी

आईचं काळीज! वाघाच्या जबड्यातून लेकीला सोडवण्यासाठी लढली अन् जिंकलीसुद्धा

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशीर्वाद आहे”

“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More