‘…तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा
मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच राज्य सरकार लॉकडाऊन लागू करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अशातच यावर वस्त्रोद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेला वारंवार विनंती करत आहेत. जनतेने बाहेर पडू नये, नियम पाळावेत असे ते सांगत आहेत. मात्र कोणीही ऐकत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात सध्या जे नियम रात्री लावलेले आहेत, ते सकाळी लावावे लागतील, असं म्हणत अस्लम शेख यांनी नागिरकांना इशारा दिला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाबाबतीत नवी नियमावली जाहीर केली होती. त्यामध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र यायंचं नाही, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड तर सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, बार आणि हॉटेल, सिनेमागृह रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद ठेवायले सांगितले होते.
दरम्यान, अस्लम शेख यांच्य म्हणण्याप्रमाणे जर रात्रीचे नियम सकाळी लावले तर मोठ्या प्रमाणात लोकांना याचा त्रास होईल. त्यामुळे नागरिकांनी सरकारला सहकार्य करत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यास प्रवृत्त करायला नको. लॉकाडाऊनमुळे आपल्यालाच त्रास होणार आहे. मात्र जर रूग्णांची संख्या ही अशाचप्रकारे वाढली तर सरकार तशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतं.
थोडक्यात बातम्या-
काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला झाली कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती
‘कोरोनाबाधिताला बेड मिळाला नाही तर…’; मुंबई महापालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये
पुण्यातील ‘त्या’ सामूहिक बलात्काराचा उलगडा, नराधमाने शारीरिक संबंध ठेवू न दिल्याने चालवली होती गोळी
साप मुंगसाच्या भांडणाचा थरार पाहून तूम्हीही व्हाल थक्क! पाहा व्हिडीओ
शरद पवार, अमित शहांच्या भेटीवर ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य; ‘आगे आगे देखो होता है क्या’
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.