बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती आणि लोकांचे जीवही गेले नसते”

मुंबई | देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विटद्वारे सडकून टीका करण्यात आली आहे.

देशभरात सध्या कोरोना लसीचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि व्हेंटिलेटर बेड्स तसेच ऑक्सिजन बेड्स यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरूनच राजकीय वर्तुळात अनेक टीकाटिप्पणीला चांगलंच उधाण आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने “उशिरा का होईना मोदी सरकारला अक्कल आली” अशा आशयाचं एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

“कोरोनावरील इतरही लसींना मान्यता द्यावी, हा सल्ला राहुल गांधींनी फार आधीच दिला होता. मात्र, लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली. जर हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाट आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते” असं ट्विट करून महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधानांवर थेट निशाणा साधला आहे.

देशासह महाराष्ट्रातही कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच काही ठिकाणी उपचाराअभावी रुग्णांना नाहक जीव गमवावा लागत आहे. त्यातच राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या –

बस कंडक्टर महिलेची निर्घृण हत्या; बुलडाण्यातील थरकाप उडवणारी घटना

…अन् स्वप्नांचा क्षणातच चुराडा झाला; नववधूला घरी घेऊन जाताना नवरदेवाचा रस्त्यातच झाला मृत्यू

कोरोनाबाधित आईची एक चुक बेतली तिच्या चिमुकलीच्या जीवावर

देशात कोरोनाचा कहर; अदर पुनावालांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे केली ही विनंती

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More