महाराष्ट्राला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?, राजेश टोपे म्हणाले…
मुंबई | देशात डिसेंबर अखेर कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. काही दिवसांमध्येच अचानक रूग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नविन कोरोनारूग्ण आढळण्याचं प्रमाण अल्प आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
देशात किंवा राज्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते का? , असा प्रश्न पत्रकारांनी राजेश टोपे यांना विचारला होता. त्यावर राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, सर्वांत महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे की, नविन केसेसची संख्या कमी झाली आहे. राज्यामध्ये सक्रीय रूग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे. एकेकाळी तिसरी लाट एवढी मोठी होती की, 48 हजार रूग्ण आढळत होते, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
समाधानाची बाब ही आहे की, केसेसचं प्रमाण कमी झालं आहे. लसीकरणाचं प्रमाण खुप चांगलं आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी ज्या नागरिकांनी अद्यापही लसीकरण केलेलं नाही त्यांना लसीकरण करण्याची विनंती केली आहे. जे राहिलेलं लसीकरण आहे त्यांना मनापासून विनंती करायची आहे की, पूर्ण लसीकरण करून घ्यावं, असं राजेश टोपे सांगितलं.
दरम्यान, जर खऱ्या अर्थाने चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित राहयचं असेल , समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करून घेणं ही काळाची गरज आहे. जर आपल्या सर्वांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल आणि आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये फाईटआऊट करण्याची प्रतिबंधात्मक शक्ती असेल तर निश्चित प्रकारे चौथ्या लाटेचा कोेणताही धोका नसेल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
मोठी बातमी! चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना न्यायालयाचा दणका, ‘इतक्या’ वर्षांची सुनावली शिक्षा
“राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन…”
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच…
“गधे को दिया मान.. गधा पहुँचा आसमान”
Comments are closed.