मुंबई | कोरोना चाचण्यांसाठी अवाजवी दर लावणाऱ्या प्रयोगशाळांना आता चाप बसणार आहे. अतिरिक्त दर आकारणाऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेत.
कोरोना चाचणीसाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराऐवजी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या खाजगी प्रयोगशाळांना नोटीस बजावावी, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिलेत.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “अतिरिक्त दर आकारणाऱ्या खासगी प्रयोगशाळांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट द्यावी तसंच त्यांची झाडाझडती घ्यावी. जर या तपासणीत एखाद्या प्रयोगशाळेत अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचं आढळून आलं तर संबंधितांना नोटीस देऊन समज देण्यात यावी.”
नोटीस देऊनही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रयोगशाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशा सूचनाही महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
कोरोना विषाणूचे दुष्परिणाम वाढले; ‘या’ रूग्णांनी काळजी घ्यावी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची 6 तास चौकशी
“भाजप सोडून कोणीही जाणार नाही, काहीजण उगाचच वावड्या उठवतात”
ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी शरद पवार पश्चिम बंगालला जाणार- नवाब मलिक