Top News कोरोना

…तर जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल- राजेश टोपे

मुंबई | कोरोनाचं लसीकरण राज्यात केव्हा सुरु होणार याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न आहे. अखेर यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलीये.

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून भारतात लवकरच लस उपलब्ध होणारे आहे. यासाठी राज्य सरकारने देखील लसीकरणासाठी पूर्व तयारी केलीये.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “केंद्र सरकारला खात्री असेल तर त्यांनी परवानगी द्यावी. मला वाटतं की, डिसेंबरच्या अखेरपर्यंत जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर जानेवारीपर्यंत लसीकरणाचा कार्यक्रम राबवता येईल.”

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मात्र आपल्याला तसं काही करायची गरज नाही. आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध असून गरज पडली तर सुट्टी रद्द होईल, असे आरोग्यमंत्री म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी; प्रविण दरेकर यांची मागणी

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका; महाविकास आघाडीची नाही- अजित पवार

ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे

‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या