बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर विराट कोहली ट्रिपल सेंच्युरी मारणार; कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली सध्या खराब फाॅर्ममधून जात आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकांसह विराट सध्या तिसऱ्या स्थानी आहे. मात्र गेल्या दोन वर्षात विराटने एकही शतक केलं नाही. त्यामुळे आता त्याच्या फाॅर्मच्या चिंता सर्वांनाच लागली आहे. त्यातच आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये कोहली चांगल्या धावा करत होता, तेव्हा कोणीच त्याच्या बॅटिंगबद्दल बोलत नव्हतं. पण त्याच्या कमी धावा झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. क्रिकेटसारख्या खेळात एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार होतच असतातच. त्यामुळे जेव्हा विराट शतक आणि द्विशतकं केली होती तेव्हा हा सगळा चांगला अनुभव नव्हता का?, असा सवाल कपिल देव यांनी उपस्थित केला आहे.

कसोटी सामन्यात विराटच्या 254 सर्वोच्च धावा आहेत. तो फाॅर्ममध्ये आल्यावर एवढ्यावरच समाधानी राहणार नाही. तो आगामी काळात ट्रिपल सेंच्युरी देखील मारणार, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात विराट सर्वांनाच अनपेक्षित असलेले विक्रम करेल, असंही कपिल देव म्हणाले आहेत.

दरम्यान, विराट कोहली कर्णधारपदाची जबाबदारी असल्यानं त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होत आहे, त्यामुळे तो कर्णधार पद सोडू शकतो, अशी चर्चा सुरू होती. मात्र बीसीसीआयने या चर्चांवर फुल्लस्टाॅप लावला आहे.

थोडक्यात बातम्या-

जनता भोळी जरूर आहे पण मुर्ख नाही – चंद्रकांत पाटील

आरसीबीचा ‘वाघ’ एबी डिव्हिलियर्सचं वादळी शतक, गोलंदाजांना भरणार धडकी, पाहा व्हिडीओ

महात्मा गांधींना RSSच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या?- राहुल गांधी

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More