बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर आपल्याला तिसऱ्या लाटेलाही सामोरं जावं लागेल- उद्धव ठाकरे

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना दिल्या आहेत.

पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करत गेलो, दुसऱ्या लाटेनं आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोना संपला आहे अशा भ्रमात राहून गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाही तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपल्याला तिसऱ्या लाटेलाही सामोरं जावं लागेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

तसेच टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर द्यावा. लसीकरण हा या लढाईतील महत्त्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणं हे ही तितकंच अत्यावश्यक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

…तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल- प्रकाश आंबेडकर

‘…तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही’; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

“उद्धव ठाकरे मोदींसमोर नाक घासून आलेत, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय?”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More