बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो’; शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

मुंबई | आज हिंदी सनेमासृष्टीतील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वी मी त्यांना भेटूनही आलो होतो. पण मी माझ्या एक जवळच्या स्नेह्याला आज गमावलं आहे. दिलीप कुमार यांना जेवढं आयुष्य लाभलं, त्यात त्यांनी कलेची अखंड सेवा केली, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी दिलीप कुमार यांच्यासोबतची एक गोड आठवण सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला कळालं होतं की दिलीप कुमार एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त पुण्यात आले आहेत. त्यांच्या चित्रपटाच शूटिंग पाहायला आम्ही सायकलवरुन गेलो होतो. तेव्हा दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहण्याची संधी मिळाली होती.

राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दिलीप कुमार आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आग्रह करुन एखादी सभा घेण्यासाठी येत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील”

जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता- असीम सरोदे

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ, कोरोनाबळी पुन्हा नऊशेपार

जळगाव महापालिकेत खळबळ; नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का

…असं काहीतरी होणारच होतं, कारण ईडी ही भाजपची प्रेयसी आहे- अमोल मिटकरी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More