देश

…तर त्या 5 अधिकाऱ्यांना ‘बंगालभूषण’ पुरस्कार देणार- ममता बॅनर्जी

कोलकाता |  केंद्र सरकारनं 5 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेली पदकं माघारी घेतली तर मी त्या अधिकाऱ्यांना बंगालभूषण पुरस्कार देईन, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.  

केंद्रीय गृह मंत्रालयानं ममता बॅनर्जी यांच्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना देण्यात आलेली पदके माघारी घेणे आणि त्यांच्या बढत्या रोखण्याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

अखिल भारतीय सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी वीरेंद्र कुमार, विनीत कुमार, अनुज शर्मा, ज्ञानवंत सिंह, सुप्रतिम सरकार या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, पश्चिम बंगालचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर देखील केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कारवाई केली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘यांचं’ नाव चर्चेत!

मुंबई महानगरपालिकेच्या 20 नगरसेवकांचं पद रद्द, मात्र एकही गुन्हा दाखल नाही!

-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला सरकारला घरचा आहेर!

-काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांची विधानसभा अध्यक्षांवर टीका करताना जीभ घसरली

रोहित शर्मानं केले 5 विक्रम; विराट आणि धोनीसुद्धा राहिले मागे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या