मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते राजभवन येथील इंग्रजांच्या काळातील बंकरमधील क्रांती गाथा या भूमिगत दालनाचे आणि जलभूषण या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी बोलताना राज्यपालांना टोला लगावला आहे.
राजभवनातील कार्यक्रमामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पंतप्रधानांच्या समोर राज्यातील अनेक समस्यांचा पाढा वाचला. मी काही दिवसांपुर्वी औरंगाबाद येथे गेलो होतो. तिथल्या लोकांनी माझ्याकडे पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. औरंगाबाद पाणीप्रश्न पंतप्रधानांनी सोडवावा, अशी अपेक्षा भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर समस्या मांडल्याने वातावरण तापले होते.
मुख्यमंत्री भाषणास गेल्यानंतर वातावरण थोडे निवळले. राज्यपालांचे निवासस्थान जलभूषणचे नुतनीकरण झाले आहे. ते खुपचं मोठे आणि चांगले दिसत आहे. मग करायचं का एक्सचेंज?, असा प्रश्न करताच उपस्थितांमध्ये हास्यतरंग उमटले. एखाद्या वृत्तपत्राला दोनशे वर्षे होतात यावर विश्वास बसत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जलभूषण ही इमारत 1885 सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. जलभूषणचे नुतनिकरण करण्यात आले आहे. त्यावरून काळ बदलत असला तरी वास्तू इतिहासाच्या खुणा जपत हे काम करण्यात आलं आहे. जलभूषणचं काम कलात्मक नजरेतून करण्यात आले आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने धार्मिक कार्यक्रम राजकीय करून टाकला”
‘हा महाराष्ट्राचा अपमान,अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही हा अन्याय’; सुप्रिया सुळे संतापल्या
‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
“…म्हणून शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये”
पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने वारकरी आहेत- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.