बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली?’; राष्ट्रवादीचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई | संसदेच्या अधिवेशनाला आता 3 आठवडे पुर्ण होत आले तरी देखील संसदेचं कामकाज ठप्प झालं आहे. काँग्रेससह 14 पक्षाच्या नेत्यांनी संसदेत गोंधळ घालून केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार देखील या प्रकरणात खुलासा करण्यास तयार नाही. त्यामुळे आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीने देखील पेगॅसस प्रकरणात आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

पेगॅसस स्पायवेअरची निर्मिती करणारी इस्रायली कंपनी एनएसओने जर देशात हेरगिरी केली नाही तर मग कोणत्या देशाने येऊन हेरगिरी केली हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ही घटना गंभीर असून केंद्राने तात्काळ या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारने संसदेत सरकारच्या कोणत्याही संस्थेने पेगॅसससोबत व्यवहार केले नाहीत किंवा सेवा घेतली नाही, हे स्पष्ट करावं, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी या प्रकरणावर खुलासा करत असतील तर तो सरकारचा खुलासा होत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. सरकारने स्वतः समोर येऊन या प्रकरणात उत्तर देण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. हे प्रकरण गंभीर आहे, यात काही शंकाच नाही. या प्रकरणात सत्य बाहेर यायला पाहिजे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 9 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमात केले बदल

“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”

आता विदेशातील नागरिकही घेऊ शकतात भारतात लस, केंद्राचा महत्वपुर्ण निर्णय

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले

UPSC उमेदवारांची चिंता वाढली; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More