Top News राजकारण

…तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?- हसन मुश्रीफ

कोल्हापूर | भाजपच्या गोपीचंद पडळीकरांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्र लिहून त्यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी गोपीचंद पडळकर यांना बोलवता धनी वेगळा असल्याचं म्हटलंय.

कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नौटंकी करणारे अनेकजण पाहिलेत. पडळकर यांचा बोलता धनी वेगळा आहे. आणि त्याने पडळकर यांना आवरावं.”

“धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 5 वर्ष सत्तेत राहून देखील आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते,” असा सवालही हसन मुश्रीफ यांनी केलाय.

“धनगर समाजासाठी आरक्षण न घेताच गोपीचंद पडळकर भाजपकडून आमदार झाले होते. हे कशाचं बक्षिस आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं,” मुश्रीफ यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; नाटकाचे प्रयोग केले रद्द

“करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली”

OLX पे बेच दो…पंतप्रधान मोदींचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला

उडता कोहली! हवेत झेप घेत कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पाहा व्हिडीओ

उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या