बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामं करता का?’; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं

मुंबई | सध्या देशात सर्वत्र लसीकरण मोहिम चालू आहे. वयोवृद्ध आणि इतर आजारांनी ग्रासलेल्या लोकांना लसीकरणासाठी विशेष कालावधी देण्यात आला होता. मात्र, 75 वर्षांवरील ज्येष्ठ, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींना लसीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यासाठीच या व्यक्तींचे घरोघरी जाऊन लसीकरण करावं, यासाठी वकील धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच झापलं आहे.

घरोघरी लसीकरणासंदर्भात राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. या लसीकरणासाठी  केंद्र सरकारने परवानगी देणं आवश्यक असल्याचं राज्य सरकारने म्हटलं होतं. त्यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता का लागते?, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.

राज्य सरकारला केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता का आहे? हा राज्य सरकारचा विषय आहे. केंद्र सरकारकडून परवानगी घेतल्यानंतरच राज्य सरकार सर्व कामे करते का? जम्मू-कश्मीर, केरळ, बिहार, झारखंड या राज्यांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली हाेती का? असे प्रश्न मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सरकारला केले आहेत.

दरम्यान, लसीकरणाबाबत राज्य सरकार केंद्राच्या सूचनांचे पालन करीत असून अद्याप घरोघरी लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. ज्या व्यक्तीला घरी जाऊन लस दिली जाईल, त्याच्या डॉक्टरांनी लस देण्याबाबत ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र द्यावं, तसेच जर काही विपरीत परिणाम झाले तर त्याची जबाबदारी संबंधित डॉक्टरांनी घ्यावी, असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘…सरकार शहाणं झालं म्हणा’; ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारचं कौतुक अन् टोमणे एकाचवेळी

“आम्ही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केलंय, आताची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही”

“फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, मराठी माणसाचा जाच तरी संपेल”

“पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?, उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ”

“पंजा फक्त टायगर जवळच असतो आणि टायगर काँग्रेसमय झालाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More