मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यावर बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं संसदेत उदाहरण दिलं. मनमोहन सिंग यांनी जो जीएसटी कायदा आणला होता. मग तोच संसदेत मंजूर का केला नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींना केला आहे.
मनमोहन सिंग यांनी एकच कृषी उपन्न बाजार समिती असावी, असं म्हटलं होतं. यावर नरेंद्र मोदी आज संसदेत बोलत होते. मोदींनी केलेल्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
देशाचे पंतप्रधान खोटं बोलत आहे. ते पुन्हा पुन्हा खोटं बोलत आहेत, अशी टीकाही नाना पटोले यांनी मोदींवर केली आहे. प्रसारमाध्यमांशी नाना पटोले यासंदर्भात बोलत होते.
दरम्यान, नाना पटोलेंनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचं सांगितलं. तसंच सगळ्यांना आपला पक्ष वाढवण्याचा आधिकार आहे. त्यांनी पक्ष वाढवावा. आम्हीही आमचा पक्ष तळागाळापर्यंत नेऊ, असंही पटोले म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?’; ‘स्वाभिमानी’ पोराचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन
‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल
‘मोदी है, मौका लिजिए’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”
…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!