बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

मुंबई | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांना समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर टिप्पणी करू नयेत, असा आदेश दिला होता. मात्र, मलिकांनी न्यायालयाच्या या आदेशाचं पालन केलं नाही.

आदेशाचं पालन न केल्यानं मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना उल्लंघन केल्याप्रकरणी अवमान कारवाई का करू नये? अशी विचारणा केली आहे. नबाव मलिकांनी कोणतेही आरोप करणार नसल्याची हमी दिली होती. त्याचं देखील त्यांनी उल्लंघन केलं आहे.

मागील सुनावणीनंतर मलिकांनी काही मुलाखती दिल्या होत्या. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं गेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मलिकांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा निष्कर्ष नोंदवला गेला होता.

दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं असून शुक्रवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता मलिकांच्या अडचणी वाढणार का? याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सरसकट निवडणुका रद्द करा”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक भूमिका

“सुशांत तुझी आज आठवण येते”; सारा अली खानने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मोदी सरकारची भन्नाट योजना, मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मिळतील 15लाख

अनिल देशमुख प्रकरणी सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी; वाचा नेमकं काय झालं?

“हेच का तुमचे संस्कार?”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More