बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तरच 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

मुंबई | देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचं दिसत आहे. यामुळे त्यामुळे 18 वर्षांपुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

18 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या लोकांना लस दिली जावी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विनंती केंद्र सरकारने अजून मान्य केलेली नाही. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकची लस उत्पादित करण्याची सध्याची क्षमता अपुरी असल्यामुळे लस सर्वांना दिली जाऊ शकत नाही, अशी माहिती आहे. ‘लोकमतने’ या संदर्भातील वृत्त दिलंय.

दोन पुरवठादारांना लसीची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी सात महिने लागतील. सिरमकडे जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांना लस निर्यातीची मोठी जबाबदारी आहे. ही प्रचंड मागणी सध्याची लस उत्पादन क्षमता वाढवली आणि बाजारात नव्या लसी आल्या तर पूर्ण केली जाऊ शकते.

दरम्यान, कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रूपयांची गरज आहे, असं कालच अदर पुनावालांनी सांगितलं आहे. कंपनीला आताच्या तुलनेत मोठा नफा कमवायला हवा होता. जेणेकरून ती रक्कम उत्पादन आणि सुविधांसाठी पुन्हा गुंतवता आली असती. तसंच अधिक डोसही उपलब्ध करता आले असते, असं अदर पूनावाला म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

…तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील- अनिल परब

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं, म्हणाले…

गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान थांबेना; आज दिवसभरातील आकडेवारी चिंताजनक

11 एप्रिलपासून तुमच्या कार्यालयातच कोरोना लस मिळणार, केंद्राकडून राज्यांना तयारीचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More