बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता बेडवर पडून निवांत झोप काढण्याचेही मिळणार लाखो रुपये

नवी दिल्ली | कामाच्यावेळी झोपणं हे खरंतर कामचुकारपणाचं लक्षण मानलं जातं. परंतु जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, काही ठिकाणी झोप काढण्याचेच लाखो रुपये दिले जातात. तर कदाचित ते खरं वाटणार नाही. मात्र अनेक ठिकाणी असे झोप काढण्याचे जॉब दिले जातात आणि त्यासाठी तुम्हाला पगारही दिला जातो. ते जॉब नेमके काय आहेत, ते पाहूयात.

स्लीप रिसर्च सब्जेक्ट म्हणून काही रुग्णालये, विद्यापीठे, संशोधन केंद्र अशी नोकरी देतात. ज्यामध्ये त्या व्यक्तीला संशोधनासाठी केवळ बेडवर निवांत झोप काढायची असते. त्यासाठी त्या व्यक्तीला 2.5 लाख रुपये दिले जातात. त्यानंतर एनव्हायरमेंट स्टडी टेस्टर असाही एक जॉब आहे. ज्यामध्ये बदलत्या वातावरणाचा व्यक्तीच्या झोपेवर काय परिणाम होतो. याचा अभ्यास करण्यासाठी व्यक्तीला झोप काढण्याचे पैसे दिले जातात.

याशिवाय बेड मॅट्रेस टेस्टर या जॉबमध्ये तुम्हाला त्या कंपनीच्या मॅट्रेसवर झोप काढून त्याबद्दल रिव्हू्यु द्यायचा असतो. त्यानंतर स्लीप टेस्टर अशी एक पोस्ट असते. ज्यामध्ये व्यक्तीच्या झोपेचा अभ्यास करण्यासाठी व्यक्तीला पैसे दिले जातात. त्यासाठी व्यक्तीला झोप काढण्यासाठी रिसर्च सेंटर व्यक्तीला भरमसाठ पगार देते.

एका अहवालानुसार, अशा कंपन्या, रिसर्च सेंटर वर्षाला 12 ते 15 लाखांपर्यत पगार देते.  एका चिनी फर्म नाओ बायजिनने स्लिप टेस्टर या जॉबसाठी वर्षाला 15 लाखांचा जॉब ऑफर केला होता. त्यामुळे या जॉबमुळे केवळ आराम करुन तुमच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये जमा होणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

सिग्नलच्या देखभालीसाठी पुणे महानगरपालिका खर्च करणार तब्बल एवढे कोटी

“मोदी सरकारने देश अडचणीत आणलाय, वाढती महागाई अन्…”

आर्यन खान प्रकरणात दावा करणाऱ्या मनिष भंगाळेंचा एकनाथ खडसेंच्या ‘या’ प्रकरणातही होता थेट संबंध

मोठी बातमी! महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण

आरोग्य विभागाच्या गट-ड च्या परिक्षेतही पुन्हा तोच गोंधळ

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More