बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाचे आहेत, ते पैसे दिले की नाचतात”; नारायण राणेंचा खोचक टोला

सिंधुदुर्ग | आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे विधानसभेबाहेर आदित्य ठाकरेंना Aaditya Thackrey) डिवचल्याप्रकरणी चांगलेचं अडचणीत आले आहेत. अधिवेशनातही यावरून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नितेश राणेंना धारेवर धरल होतं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी भास्कर जाधवांना खोचक टोला लगावला आहे.

भास्कर जाधवांनी विधानसभेत केलेल्या मोदींच्या नकलीवरूनही राणेंनी जाधवांना सुनावलं आहे. “कोकणात काही भागात नाचे आहेत. ते होळीच्या दिवसात पैसे दिले की नाचतात. त्यातला तो प्रकार विधानसभेत त्या दिवशी झाला,” असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावला आहे. शिवाय जाधव यांच्या नकलीचे उत्तर नकलीतूनच दिले जाईल असेही ते म्हणाले आहेत.

भास्कर जाधव आणि नारायण राणे हा वाद वाढतचं चालला आहे. नारायण राणेंनी भास्कर जाधवांना नाचा म्हटलं आहे. तर भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना उत्तर देताना नक्क्ल जरा चांगली करा असा चिमटा काढला आहे. शिवाय तुम्ही संसदेत दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे, आता नाच्याचे काम तरी चांगले करा आणि नाव कमवा , असा टोलाचं भास्कर जाधवांनी लगावला आहे.

दरम्यान, सिंधूदूर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून नितेश राणे यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याशिवाय नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला आहे.

थोडक्यात बातम्या-

आनंद महिंद्रांचा दिलदारपणा; हात-पाय नसलेल्या ‘त्या’ व्यक्तीला दिली नोकरीची ऑफर

सोनं-चांदीच्या दरात वाढ, वाचा आजचे ताजे दर

“…अन्यथा नारायण राणे यांचा जसा राजकीय अंत झाला, तसाच त्यांच्या मुलांचाही होईल”

कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना – नारायण राणे

“नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे, पण मी का सांगू?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More