बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत

नाशिक | नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. आता नाशिकमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानं रूग्णांना रूग्णालयात बेड मिळत नसल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे.

रविवारी नाशिकमध्ये 2 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक महापालिका श्रेत्रात 1 हजार 890, नाशिक ग्रामीणमध्ये 917, मालेगाव महापालिका हद्दीत 78 तर जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या 40 रुग्णाचा समावेश आहे.

महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण

भाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

शरद पवारांना नेमकं काय झालंय?; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

…म्हणून हार्दिक पांड्यानं भर मैदानात घातला साष्टांग दंडवत, पाहा गमतीदार व्हिडीओ

‘अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे…; महाराष्ट्राची वाट लावू नका’There are no beds available for corona patients in this city

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More