“किरीट सोमय्या कोण मला माहिती नाही, असे चु… देशात भरपूर आहेत”
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर जहरी टीका केली आहे. पत्रकारांनी किरीट सोमय्यांसंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत भडकले.
किरीट सोमय्या कोण आहेत हे मला माहिती नाही. असे चु….. देशात भरपूर आहेत. देशात असे चु…2024 नंतर राहणार नाहीत. त्यासंदर्भात शिवसेनेला प्रश्न विचारू नयेत. त्यानंतर राजकारण लोकशाही आणि पारदर्शक असेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. देशाच्या राजकारणात अनेक बदल होणार आहेत. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, केसीआर, उद्धव ठाकरे यांची गैरभाजप शासित सरकार देशाच्या आगामी राजकारणाबाबत चर्चा करत आहेत. नव्या राजकारणाच्या स्थितीवर देश जात आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना एक मुख्यमंत्री भेटायला येतो. त्याचा अशाप्रकारे अपमान केला जातो. राज्यातील साडेअकरा कोटी जनतेचा आणि मुख्यमंत्र्याचा अपमान आहे. ज्या प्रकारची भाषा हे लोक वापरतात त्यांना मी चु… म्हणतो. मराठीचा अपमान करणाऱ्या लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देतं. 2024 च्या निवडणुकीपासून देशाचं राजकारण बदलणार आहे. गैर भाजप राज्य सरकारांमध्ये महत्वाची भूमिका असणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे मी आज जिवंत आहे”
“मी पहाटे 5 वाजता उठूनही काम करायला तयार पण…”
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर जोरदार प्रहार
Comments are closed.