‘घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चा होऊ शकते’; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन
मुंबई | गुवाहाटीतून पत्र लिहिण्यापेक्षा 24 तासात मुंबईत परत या, असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं होतं. तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायलाही तयार आहे. तुम्ही फक्त समोर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं मोठं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं होतं.
संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यात संजय राऊत यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा साद घातली आहे.
चर्चेतून मार्ग निघु शकतो. चर्चा होऊ शकते, असं आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. तर घरचे दरवाजे उघडे आहेत का उगाच वणवण भटकतायत, असं ट्विट करत संजय राऊतांनी आमदारांना चर्चा करण्यासाठीचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या आवाहनानंतर आता शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार, हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
चर्चेतून मार्ग निघू शकतो.
चर्चा होऊ शकते.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2022
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी रवाना, शिवसेनेतील गळती कायम
‘आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
“कॅरम खेळण्यापुरते सुद्धा आमदार उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहणार नाहीत”
आता पुढं नेमकं काय होणार?, गुवाहाटीतून शिंदे गटातील आमदाराचा मोठा खुलासा
सलग दुसऱ्या दिवशी ‘सामना’तून तोफ धडाडली, पाहा कुणाकुणाला दिलाय इशारा!
Comments are closed.